Breaking News

हम इलेक्शन के तुफानों मे घिरे है, हम क्या करे

या.. हू.. कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम इलेक्शन के तुफानों मे घिरे है, हम क्या करे, म्हणत बारामतीचे राजकुमार पार्थ मावळच्या मैदानावर शम्मी कपूर स्टाईल नाचत असल्याचे पाहून त्यांच्या पिताश्रीने मावळमध्येच ’मेरे सीने मे भी दिल है, मुझे पत्थर तो न समझो, मै हू आखीर एक बाप’ म्हणत ताई, माई, अक्का, माझ्या पार्थला ’दे, दे, दे मुझे प्यार दे’च्या चालीवर ‘द्या, द्या, द्या मत, द्या रे’ म्हणून राग आळवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मावळच्या लोकसभा मैदानात  मतदारराजाची करमणूक होत आहे. 

चैत्र शुध्द प्रतिपदा शालिवाहन शके 1941 विकारीनाम संवत्सराचा प्रारंभ शनिवारपासून झाला. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. प्राचीन ग्रंथांमध्ये या संवत्सराचे फळ दिले आहे. या विकारीनाम संवत्सरामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. सगळ्यांचे लक्ष तिकडे लागले आहे. या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने निर्णय देणार, कमळ फुलणार की नाही याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात निवडणूक जाहीर झाली की तरुणांपासून जर्जर म्हातारे झालेले नेते ’अभी तो मैं जवान हूँ’  म्हणत  नवीन जाकीट घालून  तिकिटाच्या रांगेत उभे राहतात. मलाच तिकीट का हवे हे सांगणार्‍या मुलाखती छापून आणल्या जातात. शक्तिप्रदर्शन केले जाते. तिकीट न मिळालेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या कोलांटउड्या सुरू होतात. महाराष्ट्रात ’तुम तो ठहरे परदेशी, साथ क्या निभाओंगे’ म्हणणार्‍या वाघाने ’हम बने, तुम बने, एक दुजे के लिए’ म्हणत कमळाबाईला वरमाला घातली. आघाडीत मात्र एकमेकांना ’आय डोंट नो व्हॉट यू से, बट आय वॉन्ट टू डान्स अ‍ॅण्ड प्ले, आय वॉन्ट टू प्ले द गेम ऑफ़ पॉलिटिक्स’ म्हणत नाच सुरूच आहे.  रायगड जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी मावळमध्ये राष्ट्रवादीचे

सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवण्यास सिध्द झाल्यावर सेना-भाजप युतीच्या श्रीरंग बारणेंनी ’मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है, तुम्हारा क्या काम है’ म्हणण्यास सुरुवात केली. त्यावेळी  ’अरे दिवानो, मुझे पहचानो, मै हू डॉन, मै हू, मै हू बारामतीका डॉन’ म्हणत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत बारामतीच्या पप्पूच्या अगाध लीला सुरू झाल्या. त्या पाहून येथील मतदारांची करमणूक होत आहे. त्यामुळेच अजितदादांना ताई, माई, अक्का  म्हणावे लागत आहे. पाहा बापावर काय वेळ आली आहे. मुलाला मत द्या, त्याला निवडून द्या सांगण्यासाठी फिरावे लागत आहे.  रायगड मतदारसंघात सेना- भाजप युतीच्या अनंत गीतेंविरुध्द राष्ट्रवादीने सुनील तटकरेंना उभे केले आहे. या मतदारसंघात ’जहाँ चार यार मिल जायें, वहीं रात हो गुलज़ार’च्या चालीवर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, काँग्रेसचे माणिक जगताप, मधुकर ठाकूर आणि शेकापचे जयंत पाटील हे ’जहाँ चार यार मिल जायें, वहीं चुनाव हो आसान’ म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे तू तू, मै मै करणारे चार यार एकत्र पाहून  रायगडच्या मतदारराजाची करमणूक होत आहे. आता आपल्या विकासात कोणतीच अडचण राहिली नसल्याची त्याची खात्री होत आहे. रायगडमध्ये विरोधकांचा हा खेळ पाहून धनुष्यबाण हाती घेऊन श्रीरंग बारणे आणि अनंत गीते यांनीसुध्दा कमळाबाईला साथीला घेऊन ’आ देखे जरा, किसमे कितना है दम’ म्हणायला सुरुवात केली आहे.

– नितीन देशमुख (7875035636)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply