कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली सेक्टर 4 मधील अमोल जाधव व बंधुचे स्पोर्ट्स साहित्याच्या शॉपचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या दुकानात स्पोर्ट्सचे संपूर्ण साहित्य येथे मिळणार आहे. अमोल जाधव, विक्रम जाधव, दिनेश जाधव हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी खेळासोबतच स्पोर्ट्स साहित्याचे दुकान सेंट जोसेफ शाळेसमोर चालू केले आह. या दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळी उत्तर रायगड भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव बारगजे, जिल्हा चिटणीस अशोक मोटे, कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, वहाळ येथील साई संस्थांचे अध्यक्ष रविनाथ पाटील आदी उपस्थित होते.