Breaking News

तळोजा येथे ओला चालकास लुटले; तिघे जण गजाआड

पनवेल ः वार्ताहर

एका ओला चालकास चौकडीने लुटल्याची घटना घडली असून यातील तिघांना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे.

मोहम्मद शेख (22), गौतम पाटील (19) आणि युसूफ शेख (22) अशी या तीन आरोपींची नावे आहेत. ओला चालक रियाज शेख यांना तळोजा येथील भाडे मिळाले. चार प्रवासी घेेऊन रियाज शेख तळोजा येथे जात असताना कळंबोली लिंक रोड पेट्रोल पंपाजवळ कारमधील चौघांनी लघुशंकेचे निमित्त करून कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी गाडी थांबविली. या वेळी चौघांनी मिळून ओलाची जीपीएस यंत्रणा काढून टाकली, तसेच रियाज यांच्याकडील मोबाइल आणि रोकड हिसकावून घेतली. या झटापटीत रियाज यांनीस्वतःची कशीबशी सुटका केली व ते गाडी घेऊन तेथून निघाले. याबाबतची माहिती ओलाच्या व्यवस्थापनाला दिल्यावर त्यांनी त्याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना चार आरोपींपैकी दोघे जण तेथेच फिरत असल्याने पोलिसांनी त्या दोघांंना ताब्यात घेतले. त्यांची ओळख पटताच त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे युसूफ शेखलासुद्धा ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा अजून एक साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध तळोजा पोलीस घेत आहेत.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply