Breaking News

स्ट्रॉबेरीच्या शेतीची प्रांत अधिकार्यांकडून पाहणी

खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर

पनवेल मधील वावंजे गावात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग राबविणार्‍या सज्जन पवार व प्रशांत पवार या काका पुतण्यांनी राबविला आहे. या स्ट्रॉबेरीच्या शेतीला पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी (दि. 12) भेट देत या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती शेतकर्‍याकडून घेतली.

महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी चक्क पनवेलमध्ये पिकवण्याचा धाडस शेतकरी सज्जन पवार व प्रशांत पवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वीपणे राबविला. या शेतीची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयोगाची माहिती घेण्यासाठी प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी वावंजे येथील सज्जन पवार यांच्या शेतीला भेट दिली. स्ट्रॉबेरीच्या शेतीची माहिती घेत शेतकरी सज्जन पवार व त्यांच्या कुटुंबीयांचे कौतुकही नवले यांनी केली. एकीकडे पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत असताना. शेतकरी शेतीपासून दुरावला असताना पवार कुटुंबीयांनी शेती टिकवून शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविन्याचे धाडस केले हे कौतुकास्पद असल्याचे मत प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी मांडले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कृषी विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे या वेळी नवले यांनी सांगितले.

पनवेलमधील कृषी अधिकारी आय. डी. चौधरी यांनीदेखील यासंदर्भात नाविन्यपूर्ण बाबीअंतर्गत स्ट्रॉबेरी लागवड यशोगाथा अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून 15 ते 20 हजारापर्यंत अनुदानासंदर्भात टिप्पणी तयार केली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply