Breaking News

क्रिकेटपटू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह; भारत-श्रीलंका दुसरा टी-20 सामना स्थगित

कोलंबो ः वृत्तसंस्था

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियाने पहिल्या ट्वेण्टी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आणि मंगळवारी (दि. 27) दुसरा सामना खेळला जाणार होता, मात्र हा सामना स्थगित करावा लागला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हा सामना बुधवारी आता (दि. 28) होण्याची शक्यता आहे. कृणालचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले आहे. या सर्वांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना विलगीकरणातच रहावे लागणार आहे.

पृथ्वी, सूर्यकुमारचा इंग्लंड दौरा अडचणीत?

कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा इंग्लंड दौरा अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारीच या दोन्ही खेळाडूंची इंग्लंड दौर्‍यासाठी निवड केल्याचे जाहीर केले होते. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे इंग्लंड दौर्‍यावरून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांना बदली खेळाडू म्हणून पृथ्वी व सूर्यकुमारची निवड झालीय.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply