Breaking News

जळगावमध्ये भीषण टेम्पो अपघातरीं 15 मजुरांवर काळाचा घाला

जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात यावल-चोपडा रस्त्यावर किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात एक टेम्पो उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. 15) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पपई भरलेला आयशर टेम्पो रावेरकडे निघाला होता. मध्यरात्री 1च्या सुमारास रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो उलटला. या अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. सर्व मजूर हे झोपलेले होते. त्यामुळे काही कळण्याच्या आता काळाने त्यांच्यावर झडप घातली. मृतांमध्ये आभोडा, केर्‍हाळा आणि रावेर येथील मजुरांचा समावेश आहे, तर पाच जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply