Breaking News

भिंतीवरील संदेशातून स्वच्छतेचा नारा

पनवेल महापालिकेची जनजागृती

पनवेल : नितीन देशमुख
पनवेल महापालिका हद्दीतील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रंगवून ‘स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल’चा नारा नागरिकांप्रति देण्याचा आणि त्यांच्यात स्वच्छतेविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 पनवेल शहरात राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रंगविले जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने स्वच्छतेचे महत्त्व या चित्रांतून पटवून दिले जात आहे. नागरिकांनी घनकचर्‍याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करावे, तसेच मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, हात स्वच्छ धुवा, माझी वसुंधरा अभियान, वृक्षारोपण करा, कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करा, माझे कुटूंब माझी जबाबदारी, कोरोना योद्ध्यांना सलाम असे अनेक संदेश या भिंतीवरील चित्रातून दिले जात आहेत. याद्वारे ‘स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल’चा नारा नागरिकांपर्यंत पोहचवला जात आहे.
पथनाट्य अन् स्वच्छतारथ
भिंतीवरील चित्रांबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व वॉर्डांमध्ये पथनाट्यांचे सादरीकरण केले जात आहे. याशिवाय तीन स्वच्छतारथ मार्गस्थ करण्यात आले आहेत. ही वाहने 20 प्रभागांतील कचर्‍यात टाकून देण्यात येणारे परंतु वापरण्यायोग्य जुने कपडे, इ-कचरा, जुनी पुस्तके, भांडी, चप्पल-बूट, प्लास्टिक व इतर वस्तू जमा करणार आहेत, जेणेकरून त्यांचा पुनर्वापर होईल.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply