Breaking News

आपटा फाटा परिसरात घंटागाडीच्या सुविधेची मागणी

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील आपटा फाटा येथील श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र या मठात घंटागाडीची सुविधा उपलब्ध नसल्याने कचर्‍याची विल्हेवाट लावायची कशी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्नाळा ग्रामपंचायतीतर्फे घंटागाडीची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्री स्वामी समर्थ मठातर्फे ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. घंटागाडीसाठी आकारण्यात येणारी रक्कम भरण्यास केंद्र तयार आहे. या स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्रात नियमितपणे घंटागाडी पाठवावी. त्यामुळे कचर्‍याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जाईल व स्वामींच्या मठाचा परिसर स्वच्छ राहील. ग्रामपंचायतीतर्फे श्री स्वामी समर्थ मठात त्याचप्रमाणे परिसरातील फार्महाऊसमध्ये आवर्जून घंटागाडी पाठवावी जेणकरून नदी परिसरात टाकण्यात येणारा कचरा घंटागाडीत टाकला जाईल आणि परिसर स्वच्छ सुंदर दिसेल. कर्नाळा ग्रामपंचायतीने या आपटा फाटा परिसरात घंटागाडीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्री स्वामी समर्थ मठातर्फे ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply