Breaking News

डायलिसिस सेंटरला पाच लाखांची मदत

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील अनेकांचे श्रद्धास्थान असलेले 325 वर्षांचे पुरातन प्रसिद्ध श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिरातर्फे डायलिसिस सेंटर चालविणार्‍या रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलला पाच लाख रुपये देणगीचा चेक देण्यात आला. माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या वतीने ही आर्थिक मदत केली आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलचे डायलिसिस सेंटर हे वर्षभर डायलिसिसच्या प्रत्येकी तीन पेशंट्सना आठवड्यातून प्रत्येकी दोन-दोन वेळा मोफत उपचार देते. चेक देताना मंदिराचे अध्यक्ष मुरलीधर जोशी यांसह ट्रस्टी विजय जोशी, जगन्नाथ जोशी, अ‍ॅड प्रथमेश सोमण, आनंद काळे, शरद जोशी, श्रीराम वत्सराज तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलचे  विलास कोठारी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply