मोहोपाडा : प्रतिनिधी
ऑल इज राँग हा आगामी हिंदी चित्रपट ही एक थरारक आणि श्वास रोखून धरायला लावणारी मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटात रसायनी रिस येथील विक्रम कांबळे यांची कन्या नाव्या कांबळे बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून नाव्या ही मोहोपाडा रसायनी येथील एच ओसी पिल्लई स्कूलमध्ये पहिल्या वर्गांत आहे. डीएम फिल्म्स आणि सॅम फिल्म्स एंटरटेनमेंट या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दत्ता मिरकुटे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. उत्तम पटकथा लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण 24 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येत आहे. जून 2021 मध्ये चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रसायनीतील बालकलाकार नाव्या विक्रम कांबळे चमकणार असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.