Friday , September 29 2023
Breaking News

मोदींच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडतोय

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रशंसोद्गार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पुलवामा हत्याकांडाचा बदला घेऊन भारताने आपली शक्ती अवघ्या जगाला दाखवून दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक नवा भारत निर्माण होतोय, असे प्रशंसोद्गार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 28) पनवेल येथे काढले.

भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघटन संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यानिमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल तालुका, शहर भाजपच्या वतीने मार्केट यार्ड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे अचूक वर्णन केले. मोदी यांनी गेल्या चार वर्षात विविध राष्ट्रांना भेटी देऊन तेथील राज्यकर्त्यांशी संवाद साधल्याने जगात भारताची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळेच पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर अमेरिकेसह अन्य राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दर्शवित कारवाईचे समर्थन केलेले आहे. याचाच अर्थ आज मोदींच्या नेतृत्वाखाली नवा भारत निर्माण होऊ लागला आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

या वेळी त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा ऊहापोह केला.

या योजनांची योग्य लाभार्थ्यांपर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची सर्वच क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असून, जगातील गतिमान अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाकडे मोठ्या अभिमानाने पाहिले जात आहे.आगामी काळातही प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत ठेवू या, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

या वेळी शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचीही समयोचित भाषणे झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘संघटन संवाद’ या कार्यक्रमांतर्गत देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या अनुषंगाने संघटन संवाद या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पनवेल विधानसभा विस्तारक विश्वेश साठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, उलवा नोड 2 चे अध्यक्ष विजय घरत, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांच्यासह प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग समिती अध्यक्ष अभिमन्यू पाटील, दिलीप पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अमर पाटील, विजय चिपळेकर, समीर ठाकूर, विकास घरत, नगरसेविका दर्शन भोईर, मुग्धा लोंढे, सीताताई पाटील, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, नेत्रा पाटील, आरती नवघरे, सुशीला घरत, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे, विजय पाटील, युवा मोर्चा पनवेल महापलिका अध्यक्ष दिनेश खानावकर, मयुरेश नेटकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply