पनवेल ः वार्ताहर
तालुक्यातील ताडपट्टी मालडुंगे परिसरातील आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. ताडपट्टी मालडुंगे परिसरातील काही आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना अद्यापपर्यंत जीवनावश्यक वस्तू मिळाल्या नसल्याची माहिती पत्रकार संजय कदम यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना कळविली. त्यांनी तातडीने संबंधित बांधवांसाठी नियोजन करून त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू पोलीस हवालदार मंगेश महाडिक, पोलीस शिपाई खैरनार, निलेश पाटील आदींच्या पथकाद्वारे पोहच करून त्याचे वाटप केले.