Breaking News

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

खारघर : रामप्रहर वृत्त

बेलपाडा गावातील सेक्टर 3 मधील प्रभू सृष्टी सोसायटी प्लॉट नंबर ई /106च्या सहाव्या मजल्यावर अचानकपणे आग लागल्याचे समजताच अग्निशमन गाडी येण्याअगोदर नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांनी व शिवप्रतिष्ठान मित्रमंडळाच्या सदस्यांनी मिळून ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे जीवित व वित्तहानी वाचल्याने मोठा अनर्थ टळला.

आषाढी एकादशी व स्वतःचा वाढदिवस यामध्ये व्यस्त असूनसुद्धा प्रसंगावधान राखून तत्काळ मदत केल्यामुळे सर्व नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या वेळी सरचिटणीस दीपक शिंदे, सोमनाथ म्हात्रे, विजय भोसले, रवींद्र काकडे, विजय उजळंबे, रूपेश काकडे, प्रतीक चव्हाण, आकाश काकडे, निखिल जाधव, योगेश मोरबेकर, विवेकानंद गर्जे, रोशन मोरबेकर, राकेश मोरबेकर, बंटी म्हात्रे, योगेश अमृतसागर यांनी विशेष सहकार्य केले.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply