Breaking News

पनवेलमध्ये आढळला आणखी एक मृतदेह

पनवेल : वार्ताहर

येथील शिवशंभो नाका ते रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाइकांचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत.या इसमाचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, डोक्यावरील केस साधारण असून, अंगात काळ्या रंगाचा ठिपके असलेला फूल बाह्यांचा शर्ट व मळकट निळ्या रंगाची पँट आहे. या इसमाबाबत अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे (022-27452333) किंवा उपनिरीक्षक संतोष उगलमुगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, पनवेल परिसरात मृतदेह आढळण्याचे प्रकार वारंवार समोर येत असून, अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply