मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी (दि. 22) वाढदिवस आहे. सलग दुसर्या दिवशी कोरोनामुळे राज्यातील लोक संकटांना तोंड देत आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त योगदान द्यायचे आहे त्यांनी सेवाकार्यात द्यावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी शुभेच्छा संदेश दिला आहे. ‘नागपूरच्या महापौरपदापासून राजकीय प्रवास सुरू केलेले देवेंद्रजी यांनी महाराष्ट्र या बलाढ्य राज्याची सूत्रे समर्थपणे हाताळली. सर्व समाजाला बरोबर घेऊन मुख्यमंत्रिपद भूषवले.
असा अभ्यासू नेता राज्याला लाभला हे आम्हा कार्यकर्त्यांचेही भाग्यच आहे. 52व्या वर्षात पदार्पण करणार्या देवेंद्रजींना खूप शुभेच्छा. हे वर्ष त्यांना आरोग्यदायी जावो, असे भंडारी यांनी म्हटले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …