Breaking News

भाजप महिला मोर्चातर्फे खारघरमध्ये हळदी-कुंकू

खारघर : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ खारघरचा राजा गणेश मंदिर येथे भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या हळदी-कुंकू समारंभाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

खारघर येथे आयोजीत केलेल्या हळदी-कुंकू समारंभाला पनवेल महापलिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, आरती नवघरे, महिलामोर्चा जिल्हा उपाध्यक्षा संध्या शरबिर्दे, चिटणीस गीता चौधरी, वनीता पाटील, सरचिटणीस साधना पवार, प्रतिक्षा कदम, उपाध्यक्ष आशा बोरसे, उपाध्यक्ष अनिता जाधव, चिटणीस मिरा घुगे, माजी सैनिक सेल खारघर अध्यक्ष निर्मला यादव, चिटणीस मधुमीता जेना, कोषाध्यक्ष वैश्नवी शिंदे, सुनंदा धनावडे, स्मीथा आचार्य, उमेरा खान, श्यामला सुरेश, कल्पना मोरे, आशा शेडगे, अंकता वारंग, वैशाली प्रजापती, अल्पना डे, नीता गोगरी, जयश्री गवळी, विजय सरकार, शोभा मिश्रा, राजश्री नायडू, संध्या पाटील, पूजा पालेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply