Breaking News

ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वेमार्गासाठी सिडकोचा पुढाकार

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोतर्फे नवी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी नवी मुंबईतील दिघा येथील सर्व्हे क्र. 10, 566 चौ. मी. क्षेत्रफळाची आणि सर्व्हे क्र. 22, हिस्सा क्र. 1,2 (पी), 353 चौ. मी. क्षेत्रफळाची, अशी एकूण 919 चौ. मी. क्षेत्रफळाची जमीन देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.

एमआरव्हीसीकडून सिडकोला 2018मध्ये ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी दिघा येथील उपरोक्त जमीन हस्तांतरीत करण्याबाबतची विनंती करण्यात आली होती.

दिघा येथील सदर 919 चौ.मी. क्षेत्रफळाची जमीन ही 22 हजार 500 रुपये प्रती चौ.मी. या दराप्रमाणे दोन कोटी सहा लाख 77 हजार 500 रुपये भाडेपट्टा अधिमूल्य आकारून 90 वर्षांच्या भाडेपट्ट्याने एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपरोक्त दर हा चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत वैध असून वाटप पत्र 31 मार्च 2021 पूर्वी दिले न गेल्यास सुधारित दर लागू होईल. भाडेपट्टा अधिमूल्याव्यतिरिक्त उर्वरित शुल्क, जीएसटी आणि वार्षिक भाडेही आकारण्यात येणार आहे.

सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून सिडकोने हा निर्णय घेतला आहे. सदर रेल्वे मार्गामुळे ठाणे स्थानकावरील गर्दीचा भार कमी होण्यासह कल्याण दिशेकडून येणार्‍या प्रवाशांचा प्रवास सुखकारक होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

– डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply