अमरावती : प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी मानसिक तणावातून आनंदवन येथील राहत्या घरी सोमवारी (दि. 30)
सकाळी विषारी इंजेक्शन टोचून घेत जीवनयात्रा संपविली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी करून आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर आरोप केले होते. ही चित्रफीत दोन तासांतच हटवण्यात आली तसेच त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदनही नुकतेच आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper