Breaking News

किकबॉक्सिंग स्पर्धेत ‘यूएसकेए’ अजिंक्य

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड किकबॉक्सिंग असोसिएशन आणि पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल समाज मंदिर हॉल येथे मुंबई विभागीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल, रायगड, नवी मुंबई, वसई, पालघर, मुंबई उपनगर आदी ठिकाणाहून 350 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन (यूएसकेए)च्या खांदा कॉलनी शाखेने 13 सुवर्ण आणि 12 रौप्य अशी एकूण 25 पदके जिंकून मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकाविला.
सर्व विद्यार्थी आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी येथे शिहान चिंतामणी मोकल (5 डिग्री ब्लॅक बेल्ट) आणि सेन्सेई प्रतिक कारंडे (3 डिग्री ब्लॅक बेल्ट) यांच्याकडे किकबॉक्सिंगचे धडे घेत आहेत. विजेत्या स्पर्धकांचे वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर आणि रायगड व पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पदकप्राप्त खेळाडू
सुवर्ण-काव्या मोकल, कृतार्थ खोपकर, ओम पिसाळ, सम्राट कांबळे, पंक्ती पाठक, निधी पाठक, यशश्री पाठक, हर्षदा मोकल, आर्यन बंगेरा, राजेंद्र कान्हेरे; रौप्य-अरफान शेख, स्पर्श जाधव, आदित्य कापडोस्कर, अथर्व मसूरकर, लिपिका नखले, ऊर्जा गोळे, स्मित पाटील, अथर्व भोसले, विघ्नेश पाठक, श्रवण नगरे, संयोगीता मोकल.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply