Breaking News

नेरळ-माथेरान रेल्वेचा होणार कायापालट

चार हेरिटेज ट्रॅकचा खासगी कंपन्यांमार्फत होणार विकास

मुंबई : प्रतिनिधी
अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि रेल्वेमार्गांच्या देखभालीवर तसेच इतर गोष्टींसाठी होणारा खर्च टाळण्यासाठी ‘युनेस्को’ने आंतरराष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेल्या महाराष्ट्रातील नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाबरोबरच देशातील अशा प्रकारच्या एकूण चार मार्गांचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या मार्गावर ट्रेन्सची संख्या वाढविण्यात येणार असून, या ट्रॅक्सच्या आजूबाजूला पर्यटन केंद्रही उभी केली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाबरोबरच हिमाचल प्रदेशमधील कालका-शिमला ऐतिहासिक रेल्वेमार्ग, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी-दार्जिलिंग रेल्वेमार्ग, तामिळनाडूमधील नीलगिरी येथील रेल्वेमार्गाचेही खासगीकरण करण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना या रेल्वे ट्रॅक्सकडे आकर्षित करण्याचा सरकारचा विचार आहे. खासगी कंपन्या या चारही मार्गांची देखभाल करण्यासह त्यांची जाहिरात आणि मार्केटिंग करण्याचेही काम करणार आहेत. यामधून होणार्‍या कमाईतील काही हिस्सा कंपन्यांना रेल्वेला द्यावा लागणार आहे.
या चारही रेल्वेमार्गांचे खासगीकरण कसे करता येईल आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये त्या कशा चालवता येतील या संदर्भातील सर्व काम रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेंट अथोरिटी म्हणजेच आरएलडीएकडे सोपवण्यात आले असून, अहवाल सादर करण्यासाठी चार महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.
दरम्यान, पीपीपी तत्वावर या रेल्वेचे खासगीकरण केले, तर त्यामधून रेल्वेला नक्कीच नफा होईल, असा विश्वास आरएलडीचे अध्यक्ष असणार्‍या वेद प्रकाश यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply