Breaking News

नेमबाज वेदांत पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या माध्यमिक विभाग मराठी माध्यमात इयत्ता आठवीत शिकणार्‍या वेदांत किरण पाटील याने रायफल शूटिंग प्रकारात घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे भोपाळ येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.
अहमदाबाद येथे झालेल्या आठव्या वेस्ट झोन चॅम्पियन (प्री नॅशनल-सहा राज्यांच्या खेळाडूंमधील पात्रता फेरी) 10 मी. एअर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सब-युथ/युथ/जुनियर गटातून वेदांत पाटील याने 400पैकी 380 गुण मिळवले.
वेदांत हा मुंबई येथील लक्ष्य शूटिंग क्लबमध्ये ट्रेनिंग घेत असून भारतीय रायफल शूटिंग टीमच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुमा शिरूर यांचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे. वेदांतची एकाग्रता, जिद्द आणि आत्मविश्वास यामुळेच त्याला हे यश प्राप्त झाले आहे. क्रीडा जगतातील नवा उगवता तारा म्हणूनही वेदांतकडे बघितले जात आहे. वेदांतच्या या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply