Breaking News

एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ क्वालीसला धडक, एक जण ठार

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलिसांच्या हद्दीत गुरुवारी (दि. 18) सकाळी अज्ञात वाहनाने क्वालीस कारला धडक दिली. या अपघातात राहूल धनाने (28) हा जागीच ठार झाला तर कारचालक सिध्देश पाटील (दोघे रा. अंधेरी मुंबई) हा किरकोळ जखमी झाला. पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात एक्सप्रेस वेवर गुरुवारी (दि. 18) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला. त्यात ट्रकने पुढे असलेल्या बसला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुबंईकडे माल घेऊन ट्रक जात होता. खालापूर हद्दीत चालकाचे  नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे असलेल्या बसला जोरदार धडक दिली. तर बसने समोरील दुसर्‍या बसला धडक दिली. तीन वाहनांमध्ये झालेल्या या अपघातातील ट्रक खड्ड्यात पलटी झाला. तर बसमधील तीन जण किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply