Breaking News

झाडे लावून वाढदिवस साजरा

उरण : बातमीदार

पर्यावरण दिन 5 जून या दिवसाचे औचित्य साधून पलक ट्रान्सपोर्टचे मालक विनय घरत यांनी झाडे लावून आपला वाढदिवस साजरा केला.

जासईचे पलक ट्रान्सपोर्टचे मालक विनय घरत यांचा वाढदिवस योगायोगाने 5 जून या पर्यावरण दिनी आला. त्यामुळे त्यांनी या वर्षी वाढत्या औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. हा समतोल राखण्यासाठी त्यांनी आपला वाढदिवस झाडे लावून साजरा करायचा ठरविला. विनय घरत यांनी 300च्या वर झाडे लावली. या वेळी सरपंच संतोष घरत, मा. सरपंच धीरज घरत, बळीशेठ घरत, गुरुनाथ घरत, महेंद्र अस्वले, शिवनाथ भोईर (न्हावा), संकेत म्हात्रे, कृष्णा घरत, दीपक घरत, रमेश म्हात्रे (जिते), प्रमोद तांडेल, माणिक घरत, प्रभाकर घरत, प्रदीप घरत, विजय घरत, अमृत घरत आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply