पनवेल : वार्ताहर
लग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात एका व्यक्तीने शेजारी राहणार्या माय-लेकीची धारदार चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 19) पनवेल तालुक्यातील दापोली येथे घडली. यामध्ये मुलीचे वडीलसुद्धा जखमी झाले आहेत.
पनवेल तालुक्यातील दापोली येथील अरुण डाऊर यांच्या चाळीत बळखंडे कुटुंबीय राहते. त्यांच्याच बाजूला आरोपी राहतो व तो त्याच भागात डम्परचालक म्हणून काम करतो. हे सर्व मराठवाडा विभागातील असून, ते एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात. आरोपीच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असल्याने त्याने दुसरे लग्न करण्यासाठी सुजाता (वय 18) हिला मागणी घातली होती, परंतु तिच्या घरच्यांनी वारंवार नकार दिला होता. आरोपीने शुक्रवारी सकाळीसुद्धा त्यांच्या घरी जाऊन पुन्हा लग्नाचा विषय छेडला असता, मुलीची आई सुरेखा (37) व वडील सिद्धार्थ (41) यांनी नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने तिघांवर सपासप वार केले व तो पळून गेला. या घटनेत आई सुरेखा व मुलगी सुजाता या गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडल्या, तर वडिलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील, पनवेल शहर वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे व पथक तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथके घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होती. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, परिसरातील नागरिकांकडून माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …