नवी मुंबई : बातमीदार
सानपाडा नोडमधील भाजप युवा नेते पांडुरंग आमले यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात मंगळवारी (दि. 4) करण्यात आली. दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना आमदार मंदा म्हात्रे यांनी कोरोना काळातही पांडुरंग आमले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करताना त्यांनी याहीपुढे जावून आपल्या सामाजिक कार्याच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहन केले. प्रकाशन सोहळ्यात भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे, महामंत्री डॉ. राजेश पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, आयटीसेलचे संयोजक पंकज दळवी, सामाजिक कार्यकर्ते देवनाथ म्हात्रे, सानपाडा-जुईनगर महिला आघाडी अध्यक्ष आज्ञा गव्हाणे, सानपाडा-जुईनगर मंडळ पदाधिकारी निलेश वर्पे, सुलोचना निंबाळकर, मंगल वाव्हळ, साईभक्त सेवा मंडळाचे खजिनदार प्रथमेश माने, सहसचिव विनायक काबुगडे उपस्थित होते.