Breaking News

भाजपकडून गरजूंना मदतीचा ओघ सुरूच

आमदार महेश बालदी यांच्याकडून केळवणे आदिवासीवाडीत जीवनावश्यक वस्तू

उरण : वार्ताहर

कोरोना व्हायरस पसरू नये त्या करिता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. गरिबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उरणचे आमदार महेश बालदी यांच्या वतीने केळवणे आदिवासी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शुक्रवारी (दि. 3) करण्यात आले.सुमारे 150 आदिवासी यांना वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूमध्ये तांदुळ, दल, कांदे, बटाटे, मसाला, हळद, बिस्कीट, तेल आदींचा समावेश होता. या वेळी केळवणे ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र ठाकूर, सदस्य सुशील ठाकूर, माजी उपसरपंच तथा सदस्य भानुदास गावंड, सदस्या रश्मी गावंड, सदस्या मुक्ता माळी, सदस्या सीता ठाकूर, सदस्या उज्वला ठाकूर, सदस्या शर्मिला माळी, तसेच केळवणे गावं भाजप अध्यक्ष रामचंद्र मोकळ, सामाजिक कार्यकर्ते हरिचंद्र माळी, रवींद्र माळी, हरी ठाकूर, सागर ठाकूर, मधुकर पाटील, के. जी. पाटील, अनंता गावंड, सुरेश शिवकर, रामचंद्र शिवकर, अजय शिवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. केळवणे येथील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणत मेहनत घेतली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply