Friday , September 29 2023
Breaking News

मेस्सी आणि सुआरेजच्या गोलमुळे बार्सिलोना विजयी

बार्सिलोना : वृत्तसंस्था

लुईस सुआरेज आणि लियोनेल मेस्सी यांनी दोन मिनिटांच्या अंतरातच केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने रविवारी ला लिगा फुटबॉल स्पर्धेत अ‍ॅटलेटिको माद्रीद संघावर 2-0 असा विजय मिळवला. या शानदार विजयासह बार्सिलोनाने विजेतेपदाकडे भक्कम आगेकूच केली आहे. मेस्सीसाठी ला लीगामधील हा विक्रमी 335 वा विजय आहे, तसेच त्याने आणि सुआरेज यांनी बार्सिलोनासाठी सध्याच्या हंगामात आतापर्यंत 53 गोल केले आहेत.

सामन्याच्या 28व्या मिनिटाला अ‍ॅटलेटिको माद्रीदचा खेळाडू डिएगो कोस्टाला रेफरीशी वाद घातल्याने त्याला रेडकार्ड दाखविण्यात आले. तथापि, संघाने 10 खेळाडूंसह खेळताना तगड्या बार्सिलोनाला कडवी झुंज दिली. सामना गोलशून्य बरोबरीत सुटणार, अशी चिन्हे दिसत असतानाच 85 व्या मिनिटाला सुआरेज आणि 86व्या मिनिटाला मेस्सीने गोल करीत बार्सिलोनाचा विजय पक्का केला. या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर काबीज असणारा बार्सिलोनाने दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या अ‍ॅटलेटिको माद्रीदवर 11 गुणांची आघाडी घेतली आहे. तथापि, दोन्ही संघांनी अद्याप सात सामने खेळणे बाकी आहे आणि आता अ‍ॅटलेटिकोसाठी हे अंतर कमी करणे कठीण असेल.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply