Breaking News

जेएसडब्ल्यू सिमेंटतर्फे ग्राहकांना ईझ ऑफ डुईंग बिझनेसची सोय

अलिबाग : प्रतिनिधी

जेएसडब्ल्यू सिमेंट या भारतातील आघाडीच्या ग्रीन सिमेंट उत्पादक आणि 12 अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू ग्रूपचा भाग असलेल्या कंपनीने आपल्या सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग कामकाजात डिजिटायझेशन अमलात आणून एआय समर्थित डिजिटल इंटरव्हेंशनच्या माध्यमातून आपल्या माध्यम भागीदारांना ईझ ऑफ डुइंग बिझनेसची सोय उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी त्यांनी यलोचॅट या जगातील आघाडीच्या कन्व्हर्सेशनल कॉमर्स (संवादी व्यवसाय) सेवा प्रदाता कंपनीशी भागीदारी केली आहे. यातून त्यांच्या व्यावसायिक ग्राहकांना एआय-आधारित एनीटाईम एनीवेअर बिझनेस व्यवहार करता येणार आहेत. यलोचॅट पार्टनरशीपमुळे जेएसडब्ल्यू सिमेंटला व्हॉट्सअ‍ॅपसारख्या मॅसेजिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देता येतील, व्यवहार करता येतील आणि विक्री करता येईल. यामुळे आर्थिक वर्ष 2023पर्यंत जेएसडब्ल्यू सिमेंटला सध्याच्या 14 एमटीपीए वरून 25 एमटीपीए पर्यंतचा पल्ला गाठता येणार आहे.

जेएसडब्ल्यू सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल यांच्या मते, डिजिटल तंत्रज्ञान जेएसडब्ल्यू ग्रूपच्या सर्व व्यवसायांच्या दीर्घकालीत शाश्वत प्रगती धोरणांना आकार देत आहे. आमच्या डिजिटल बदलांमुळे योग्य वेळेत डिलिव्हरी आणि सुनियोजित कार्यपद्धतींना एकूण ब्रँड अनुभवात सातत्याने होणार्‍या सुधारणांची जोड देत आमच्या सर्व ग्राहकांना ईझ ऑफ डुइंग बिझनेसचा अनुभव मिळेल.

जेएसडब्ल्यू सिमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नार्वेकर म्हणाले, आमच्या फ्रंटलाईन सेल्स टीमच्या सर्व कार्यपद्धतींमध्ये आम्ही डिजिटल इंटरव्हेंशनचा अवलंब केला आहे आणि पुढील सर्व माध्यमांमध्ये ही प्रणाली वापरात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही डिजिटला इंटरव्हेंशनचे हे लाभ आमच्या वितरकांनाही देत आहोत आणि त्यासाठी कन्व्हर्सेशनल कॉमर्स सेवा देण्यासाठी आम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा माध्यम म्हणून वापर करत आहोत. यामुळे त्यांना कुठूनही कधीही त्यांची ऑर्डर देता येईल, कामगिरी जोखता येईल, अकाऊंट स्टेटमेंट मिळवता येतील आणि अर्थातच आपल्या व्यवसायाशी कायम जोडलेले राहता येईल.

सेल्स आणि मार्केटिंग कार्यपद्धतींमधील डिजिटायझेशनसंदर्भात जेएसडब्ल्यू सिमेंटचे मुख्य विपणन अधिकारी के. स्वामीनाथन म्हणाले, आमच्या डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही क्षमता, प्रणाली, आराखडे आणि तंत्रज्ञान एकत्र आणत आमच्या ग्राहकांसोबतचा संवाद वाढवत आहोत तसेच त्यांना कमाल क्षमतेच्या वैयकतिक सेवा प्रत्यक्ष वेळेत देऊ करत त्यांचा व्यवसाय आणि पर्यायाने आमचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यात हातभार लावत आहोत. आधुनिक मोबाइल आणि एआय इंटरव्हेंशनच्या माध्यमातून ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करत आहोत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply