Breaking News

पुण्यामध्ये पद वाटपावरून शिवसेनेत नाराजीनाट्य

पालिका निवडणुकीत बसू शकतो फटका

पुणे : प्रतिनिधी

पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपपाठोपाठ शिवसेनेमध्येही संघटनात्मक बांधणी सुरु करण्यात आली आहे. त्याकरिता कार्यकर्त्यांना पद देऊन जोडून ठेवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. परंतु, याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होतो की काय अशी स्थिती शहर शिवसेनेत निर्माण झाली आहे. पद वाटपावरून शिवसेनेमध्ये खदखद सुरू असून निष्ठावंतांंना डावलण्यात आल्याने नाराजीनाट्य सुरू झाले आहे.

शिवसेनेने शहरातील विधानसभानिहाय पदाधिकारी जाहिर केले आहेत. यामध्ये नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. परंतु, निष्ठावंतांकडून मात्र, भाजपसोबत जवळीक असलेल्यांना पदे देण्यात आलाचा आरोप केला जाऊ लागला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सुचविलेले बदलही डावलण्यात आले आहेत. सेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी शहर समन्वयक, संघटक, उप शहर संघटक, उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, उपविभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशा मतदारसंघ निहाय नवनियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्तांविरुद्ध पक्ष प्रमुखांकडे तक्रार करुन दाद मागणार असणार असल्याचे ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply