Breaking News

मोटेरातील खेळपट्टीवर इंग्लंडचा लागणार कस

अहमदाबाद : वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 24 फेब्रुवारीपासून जगातील सर्वांत मोठ्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेन्नईतील दुसर्‍या कसोटीप्रमाणेच येथील खेळपट्टीवरही चेंडू फिरेल, किती गवत असेल, वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल की नाही, या काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे इंग्लंडच्या संघाला कठीण झाले आहे. दुसर्‍या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना हे समजले असावे की फिरकीच्या सहाय्याने भारतीय खेळपट्ट्यांवर धावा करणे इतके सोपे नाही, तर भारतीय संघाला घरगुती मैदानांवरील परिस्थितीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. अशातच मोटेराच्या स्टेडियममध्ये दोन प्रकारच्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला इंग्लंडला प्लेईंग इलेव्हनची निवड करणे अवघड झाल्याचे दिसत आहे. मोटेराचे स्टेडियम नव्यानेच तयार केले आहे. आतापर्यंत येथे फक्त काही टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यामुळेच कसोटीसाठी ही खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज लावणे कठीण दिसते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply