खारघर : रामप्रहर वृत्त : नगरसेवक व शहर युवा मोर्चा अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप, सेना व आरपीआयचे कार्यकर्ते यांच्यासोबत साजरी केली गेली. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, सभापती लीना गरड, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे सर, युवा सेना महानगर प्रमुख अवचित राऊत, उप महानगरप्रमुख दीपक घरत, भाजप शहर उपाध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, युवा चिटणीस अजय माळी, युवा नेता रवींद्र काकडे, अमर उपाध्याय, उत्तम मोरबेकर, वॉर्ड अध्यक्ष लखविर सिंग सैनी, सोशल मीडिया तालुका संयोजक विनय पाटील, शहर संयोजक गुरुनाथ म्हात्रे इत्यादी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना अजय माळी यांनी केली, तर महात्मा फुले यांचा जीवनपट व कार्य याची माहिती, तसेच महात्मा फुले यांच्या स्वातंत्र्य, समता, लोकशाही व विज्ञान या आधुनिक मूल्याची माहिती दीपक शिंदे यांनी उपस्थितींना करून दिली.
Check Also
राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …