बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समितीकडून अभिवादन
महाड : प्रतिनिधी
महाड क्रांतिभूमीत मंगळवारी (दि. 8) धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी चवदार तळे येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाडमध्ये मंगळवारी भारतीय बौद्ध महासभेमार्फत अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी केंद्रीय शिक्षक संजय सोनावणे यांनी धार्मिक पूजापाठ घेतले. बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष डॉ. महेंद्र शिर्के, सचिव विश्वनाथ सोनावणे, अरुण कासारे, विश्वास यादव, सज्जन पवार, श्रामणेर मिलिंद जाधव, सुनील जाधव, विलास सोनावणे, बौद्धाचार्य अशोक जाधव, नथुराम हाटे, चंद्रकांत शिर्के, सचिन सोनावणे, जयंत शिर्के, गौरू सोनावणे, बाळाराम धोत्रे, दिलीप वाघमारे, प्रा. निखिल सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाड तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखालीही धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या वेळी त्रिशरण-पंचशील घेण्यात आले. दलितमित्र मधुकर गायकवाड, मुकुंदराव पाटणे, विनायक हाटे, अशोक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी तुळशीराम जाधव, विजय साळवी, माजी अध्यक्ष भागूराम साळवी, उपाध्यक्ष दीपक गायकवाड, सरचिटणीस सखाराम जाधव, सहसचिव अशोक साळवी, दीपक साळवी, दीपक मोरे, बाबू गायकवाड, मिलिंद खांबे, बौद्ध उपासक गणेश जाधव, सम्यक शिक्षक मंचाचे अध्यक्ष नितीन जाधव, वैभव कांबळे उपस्थित होते. चवदार तळे साहित्य मंचतर्फे खुले कविसंमेलन घेण्यात आले. त्यात धम्मचक्र प्रवर्तन आणि डॉ. बाबासाहेब या विषयावर अनेक आशयपूर्ण कविता सादर केल्या. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिकेत लखुजी लोहार यांची भूमिका बजावणारे कवी अभिनेते मंगेश कंक, मुकुंद पाटणे, गंगाधर साळवी, मारुती सकपाळ, दीपक पाटील, गीतांजली साळवी, सुबोध मोरे, अविनाश घोलप, सुनील पवार, संजय तांबे आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धजन पंचायतीचे सरचिटणीस सखाराम जाधव यांनी केले.