Breaking News

पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची विजयी सलामी; ऑस्ट्रेलियाचा पराभव

कॉनवेची जोरदार फटकेबाजी

ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्था
डेवोन कॉनवेच्या 59 चेंडूंतील 99 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टी-20 सामन्यात 53 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडची 2 बाद 11 अशी अवस्था असताना कॉनवेने खेळपट्टीवर पाय ठेवला. त्याच्या तुफानी खेळीमुळे नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणार्‍या न्यूझीलंडने 5 बाद 184 अशी मजल गाठली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव 17.3 षटकात 131 धावात संपुष्टात आला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडला सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स, फाय रिचर्डसन आणि केन रिचर्डसन यांनी धक्के दिले. मार्टिन गुप्तिल आणि कर्णधार केन विलियम्सन हे लवकर बाद झाले. टीम सिफर्ट एक धाव काढून माघारी फिरला. कॉनवेने ही पडझड थोपविली. कॉनवेने ग्लेन फिलिप्स (30)सोबत चौथ्या गड्यासाठी 74, जिम्मी निशामसोबत (26)पाचव्या गड्यासाठी 47 आणि मिशेल सँटेनरसोबत (7) सहाव्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी केली. कॉनवेची झटपट प्रकारात ही सर्वोच्च खेळी ठरली. 10 चौकार आणि तीन षटकार खेचणार्‍या कॉनवेने डावाच्या अखेरच्या षटकात चौकार आणि षटकार खेचला खरा, मात्र एका धावेने त्याचे शतक हुकले.
ऑस्ट्रेलियानेदेखील पहिले दोन फलंदाज आठ धावांत गमावले. कर्णधार रोन फिंच (1) आणि जोश फिलिप (2) हे लवकर बाद झाले. कॉनवेने दोघांचेही झेल घेतले. मिशेल मार्श (45) याने सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो संघाचा पराभव रोखू शकला नाही, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 कोटी 25 लाख खर्चून स्वत:च्या संघात घेतलेला ग्लेन मॅक्सवेल एक धाव काढून बाद झाला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply