नवी दिल्ली : वृत्तसंस्था
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने अ वर्गातील क्रिकेटमध्ये 15 वर्षांत पहिल्यांदाच डावात पाच विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे विजय हजारे करंडक स्पर्धेत केरळने उत्तर प्रदेशचा तीन विकेटने पराभव केला. 37 वर्षीय श्रीसंतची आयपीएल 2021च्या लिलावात कोणत्याच संघाने दखल घेतली नव्हती. त्याने आठ वर्षांनंतर प्रथमश्रेणीचा सामना खेळताना 65 धावा देत पाच विकेट घेतल्या.
भारतासाठी 27 कसोटी, 53 वनडे आणि 10 टी-20 खेळलेल्या श्रीसंतने या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माच्या रूपात पहिली विकेट घेतली. त्यानंतर डेथ ओवरमध्ये पुनरागमन करीत उत्तर प्रदेशचा कर्णधार भुवनेश्वर कुमार, मोहसीन खान, अक्षदीप नाथ आणि शिवम शर्मा यांची विकेट घेतली.
उत्तर प्रदेशने 49.4 षटकांत 283 धावा बनवल्या. प्रत्युत्तरादाखल केरळने 48.4 षटकांत सात विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …