Breaking News

कृषी उत्पन्न बाजार समितीवर पालिकेची करडी नजर

कोविडविषयक नियमांची पायमल्ली करणार्‍यांवर तत्काळ कारवाई

पनवेल ः वार्ताहर

कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे वाढलेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेने याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सदस्य यांच्यासोबत मंगळवारी

(दि. 23) बैठक घेऊन बाजार समितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची सूचना केली आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कर्मचारीदेखील नियुक्त करण्यात आला आहे.

उपायुक्त विठ्ठल डाके, संजय शिंदे, सचिन पवार यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ही बैठक आयोजित केली होती. बैठकीला सभापती व संचालक उपस्थित होते.

बाजार समितीमध्ये व्यापार्‍यांनी कोरोनाविषयक सर्व नियम पाळणे गरजेचे आहे, अन्यथा महानगरपालिकेकडून योग्य कारवाई करण्यात येणार असल्याविषयी त्यांना सूचना देण्यात आल्या. शहरातील मच्छीबाजार समितीच्या सदस्यांशीदेखील या वेळी याबाबत चर्चा करण्यात आली. पालिका प्रशासन कोरोनाचे नियम पायदळी तुडविणार्‍या नागरिकांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांविरोधात तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना देण्यात आल्याची माहिती या वेळी उपायुक्त डाके यांनी दिली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply