भोपाळ : वृत्तसंस्था
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याची शपथ घेणार्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक बाबुलाल चौरसिया याच्या या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते.
बाबुलाल चौरसिया यांनी याआधी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत हिंदू महासभेकडून पालिका निवडणूक लढत जिंकली होती. काँग्रेसने मात्र राहुल गांधींचा उल्लेख करीत बाबुलाल चौरसिया यांचा पक्षप्रवेश कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. भाजपने या पक्षप्रवेशावरून काँग्रेसवर टीका केली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …