वाशीम : प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे तब्बल 229 विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी काहींना ना थोडीशी सर्दी आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे आरोग्य अधिकार्यांनी सांगितले, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शाळेत निवासी स्वरूपात राहणार्या व बाधा न झालेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. बाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर स्थानिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
सोलापुरात दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, कर्मचार्यांना संसर्ग
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अंत्रोळी गावातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिव्हाळा शेतकी कर्म शाळेतील 43 विद्यार्थी, आठ शिक्षक आणि कर्मचारी अशा 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे. एका 65 वर्षीय जेष्ठ नागरिकास अधिक त्रास असल्याने सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेय, तर बाकीच्या सर्वांवर शाळेच्या परिसरातच उपचार सुरू आहेत.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …