राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना रुग्णालयातून घरी पाठविताना त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. इतर रुग्णांना घरी पाठविताना मात्र त्यांची पुन्हा चाचणी केली जात नाही. मग मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंसाठी वेगळा न्याय का, असा खडा सवाल माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी या वेळी उपस्थित केला.
मुंबई महानगर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रायगड जिल्ह्यातदेखील रुग्णसंख्या वाढली आहे. ग्रामीण भागात सातत्याने कोरोना रुग्ण आढळू लागले आहेत. पुढील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी येथील आरोग्य यंत्रणा सज्ज नाही. ज्या काही सुविधा आहेत त्या जुन्याच आहेत. त्या अपुर्या पडणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भविष्यात कोरोनामुळे हाहाःकार उडेल, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …