खारघर : प्रतिनिधी
खारघर सेक्टर 33 मधील पेठ गावाजवळील खाडीमध्ये घातक रसायन टाकण्यात आल्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी झाल्याने मच्छीमारी करणार्या या शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
खारघरमधील पेठगाव लगत असलेल्या खाडीत गावातील सचिन वासकर व शेतकरी मच्छीमार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे वासकर परिवार लग्न कार्यनिमित्त तीन दिवस व्यस्त असल्यामुळे काही समाज कंटकांनी खाडीत घातक रसायन टाकल्यामुळे हजारो मासे मेल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. गावातील संदीप वासकर म्हणाले अज्ञात व्यक्तीकडून हा प्रकार झाला आहे. विशेषतः या खाडीत सद्यस्थितीत देशी विदेशी पक्षांचा किलबिलाट असतो. मेलेले मासे खाऊन पक्षी मृत्युमुखी पडू नये अशी भीती पर्यावरण प्रेमीमध्ये पसरली आहे. अशाप्रकारे नैसर्गिक साधन संपदेला नुकसान पोहचविणार्या समाज कंटकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.