डॉ. राजेश शिंदे यांची माहिती
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यात आतापर्यंत निर्धारित शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांचे 70टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, लवकरच पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनाही कोविशिल्ड लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुषचे डॉ. राजेश शिंदे यांनी येथे दिली.
कोविशिल्ड लसीकरणाची सुरूवात 9 फेब्रुवारीपासून झाली. पोलादपूर तालुक्यातील सुमारे 203जणांना कोविशिल्ड लस देण्याच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि आशासेविका यांचा समावेश करण्यात आला होता. प्रभारी तहसीलदार समीर देसाई यांनी शुक्रवारी आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक आणि अन्य शासकीय कर्मचार्यांसोबत कोविशिल्ड लसीकरण करून घेतले. यावेळी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये डॉ. राजेश सलागरे आणि डॉ. राजेश शिंदे यांनी सर्व आरोग्य कर्मचार्यांसोबत उपस्थित राहून लसीकरणाच्या कामाबद्दल सुसज्जता ठेवली होती.