Breaking News

कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलच्या स्पर्धकांची बाजी

पनवेल : रामप्रहर वृत्त

खंडाळा येथील डी. सी. हायस्कूलमध्ये दि, 24 ते 27 एप्रिल दरम्यान झालेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या संघाने 20 सुवर्णपदक, 14 रौप्यपदक, 11 कांस्यपदक व बेस्ट स्टुडंट्स, बेस्ट कुमिते, बेस्ट कता अशी पारितोषिके पटकावली.

यामध्ये वरद काळे, आर्यन जाधव, शिवम जाधव, अद्विका कोकमकर, अदित गोडबोले, चंद्रशेखर, नील नवालगी, पार्थ गांधी, हिरल बागडे, ऋग्वेद भोईर, वेदांती तुपे, वैभवी पाटील, जिज्ञासा घरत, रूद्र मोगकर यांनी सुवर्णपदक, शिवम जाधव, अदित गोडबोले, दिया गांधी, आर्णव पाटील, आर्यन जाधव, अद्विका कोकमकर, अनंता घरत, आर्यन घरत, उर्वी जोशी, शिबिन पॉल, वैभवी पाटील, जिया शहा यांनी रौप्यपदक, दिया गांधी, अनंता घरत, आर्यन घरत, शिबिन पॉल, हिरल बागडे, आयुष दाबके, ऋग्वेद भोईर, इ. अभिषेक, अथर्व मोरे, उनेज शेख यांनी कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेसाठी संघाचे प्रशिक्षक शिहान अतुल बोरा, सेनसाय हिमांशु बोरा यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply