कर्जत : बातमीदार
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या शुक्रवारी (दि. 26) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक व झी मराठीच्या होम मिनिस्टर या कार्यकर्मातून भाऊजी म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेले सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माथेरान शहरामध्ये पर्यटन वाढीकरीता पर्यटक राजदूत (ब्रँड अँबेसिटर) म्हणून निवड केली आहे.
आदेश बांदेकर यांची केलेली निवड ही माथेरानमधील पर्यटन वाढीस मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. या वेळी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते पर्यटक राजदूत (बॅड अँबेसिटर) निवडीचे पत्र देऊन झालेल्या निवडीबद्दल त्यांचे माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी उपाध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते तथा बांधकाम समिती सभापती प्रसाद सावंत, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, महिला व बालकल्याण समिती उप सभापती किर्ती मोरे, नगरसेवक राजेंद्र शिंदे, संदीप कदम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश चौधरी, रत्नदीप प्रधान, रणजीत कांबळे, स्वागत बिरंबोळे, अंकुश इचके, राजेश रांजाणे, प्रवीण सुर्वे आदी उपस्थित होते.