वसुंधरा जपली पाहिजे आणि वसुंधरेचे जतन केले पाहिजे, असे आवाहन माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केले आहे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानसाठी पर्यावरणाचा संतुलित विकास साधण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले आहे. दरम्यान, माथेरानमध्ये फेब्रुवारी महिन्यात तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र करून साजरे केले जाणारे दिवस पालिकेच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात आले.
माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटनावर अवलंबून असलेल्या या पर्यटनस्थळी पर्यटकांवर येथील आर्थिक गाडा चालतो. त्यामुळे कोणताही पर्यटक हा स्वच्छ आणि सुंदर अशा पर्यटनस्थळाला जाणे पसंत करतो आणि त्या वेळी आपले माथेरान हे आधीच सुंदर आणि स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर आहे.त्या माथेरानमध्ये अधिक संख्येने पर्यटक यावेत आणि येथील पर्यटन वाढावे यासाठी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा प्रसाद सावंत यांनी वसुंधरा वाचविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांनी आपली संकल्पना सोशल मीडियावर शेअर केली असून त्या माध्यमातून माथेरानमध्ये पर्यटक येतात आणि त्यांनी वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि खाऊची पाकिटे या रिकाम्या वस्तू जंगलात टाकल्या जातात. त्याबद्दल आवाहन केले असून वसुंधरा वाचली तर माथेरान
वाचेल आणि माथेरानचे जंगल वाचेल तसेच आपले पर्यटनस्थळ स्वच्छ आणि सुंदर राहील, असा त्यांना विश्वास आहे. त्यासाठी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी माथेरानमध्ये मैत्रीत ज्याप्रमाणे डेज साजरे केले जातात, त्याप्रमाणे पर्यावरण राखण्यासाठी त्या त्या डेजचे महत्त्व विशद करणारे उपक्रम राबवून डेज साजरे करण्याचा उपक्रम हाती घेऊन माथेरानमधील पर्यटन वाढीसाठी माथेरान गिरीस्थान नगर परिषद काम करीत आहे. त्यात महत्त्वाचे ठरेल असे प्रॉमिस म्हणजे शब्द देण्याचा दिवस नगराध्यक्ष सावंत यांनी प्लास्टिक वापरू नये, असा शब्द घेण्याचा आणि कापडी पिशवी वापरणार, असा शब्द पर्यावरणस्नेही पिशव्या पालिकेच्या माध्यमातून देऊन साजरा केला.
चला वाचवू या वसुंधरा, या शीर्षकाखाली त्यांनी पर्यटकांना आणि माथेरानकरांना आवाहन करताना मी कचरा इतरत्र फेकणार नाही आणि कोणालाही फेकू देणार नाही. मी कोणत्याही स्वरूपातील कचरा जाळणार नाही आणि इतरांनासुद्धा कचरा जाळू देणार नाही. माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापरणार नाही आणि पर्यटक म्हणून सोबत प्लास्टिकचे चमचे, ग्लास घेऊन आल्यास त्यांना त्या वस्तू वापरू देणार नाही. आपले घर, आवार, परिसर स्वच्छ-सुंदर राहील याची जाणीव कायम ठेवून त्यावर प्रत्यक्ष कार्यरत राहीन आणि इतरांनाही प्रेरित करेन, अशी हाक माथेरान नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी दिली आहे. शासन वेळोवेळी ज्या सूचना देते त्यांचे पालन करेन, अशी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. याचाच एक भाग म्हणून माथेरान गिरीस्थान नगरपालिका यांच्या माध्यमातून दस्तुरी नाका येथे टॅक्सी संघटनेचे सभासद यांना आपल्या टॅक्सीमध्ये ठेवण्यासाठी कापडी पिशव्या देत आहेत, जेणेकरून टॅक्सीने येणारे पर्यटक प्रवासादरम्यान कचरा घाटरस्त्यात फेकणार नाहीत. यासाठी ही सवय पद्धती प्रथम टॅक्सीचालकाने स्वतः अंगीकारावी असा पालिकेचा प्रयत्न आहे. पुढील काळात माथेरानमधील सर्व हॉटेलधारक, लॉजधारक यांनीदेखील आपल्या हॉटेलमधील प्रत्येक रूममध्ये कापडी पिशवी ठेवून येणार्या प्रत्येक पर्यटकाला बाहेर फिरायला जाताना अशा कापडी पिशवीचा उपयोग करण्यास आग्रही असावे, असे आवाहन केले आहे. माथेरान व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनीसुद्धा ही सवय करून घ्यावी, असे आवाहन माथेरानच्या नगराध्यक्ष सावंत यांनी केले आहे. या वेगळ्या उपक्रमात माथेरानमधील वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संघटना यांनी सकारात्मक साथ द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
माथेरानमध्ये पालिकेच्या माध्यमातून वसुंधरा वाचविण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्या वेळी माथेरानमध्ये पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठीदेखील यानिमित्ताने कामे सुरू केली जात आहेत. त्यात माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळांवर पर्यावरणस्नेही बांधकाम करून त्या प्रेक्षणीय स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएच्या माध्यमातून माथेरान गिरीस्थान नगर परिषद करीत आहे. त्यात माथेरानमध्ये असलेल्या एकूण 36 प्रेक्षणीय स्थळांपैकी महत्त्वाची असलेली 11 प्रेक्षणीय स्थळे म्हणजे पॉइंट्सचे पर्यावरणपूरक सुशोभीकरणाचे काम नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. माथेरानमधील एकूण 36 पॉइंट्सपैकी पूर्वी बरेचसे पॉइंट्स हे नामशेष होण्याच्या मार्गावर होते. काही ठिकाणी तर मुख्य
रस्त्याच्या आत असलेले परंतु निसर्गसौंदर्याने नटलेले या पॉइंटला जाण्यासाठीचे रस्तेदेखील प्रचंड पावसामुळे वाहून गेले होते. गटारे, मोर्या उद्ध्वस्त झाल्यामुळे रस्त्याच्या दगड मातीची प्रचंड धूप झाली होती. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडत पर्यावरणाला हानी पोहचत होती. ती हानी रोखण्यासाठी पर्यायाने पर्यावरण समतोल राखण्यासाठी पालिका काम करताना दिसते. पर्यटकांना पॉइंटवर घेऊन गेल्यावर घोड्यावरून उतरायला आणि पुन्हा घोड्यावर चढायला पर्यावरणपूरक घोडा स्टॅण्ड बनविले गेले आहेत. येथील अनेक ठिकाणी आता पॉइंटला जाण्यासाठी चांगला रस्ता, मुख्य रस्त्याच्या बाजूला घोडा स्टॅण्ड, पॉइंटला सोलर पथदिवे, बसायला बाकडे, गटारे, मोर्या, पायर्या, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेलिंगचे काम काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. लाल दगडांनी ही कामे सुरू असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पालिका सरसावल्याचे दिसत आहे.
Check Also
खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …