Breaking News

करंजाडे वसाहतीत विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यासह करंजाडे वसाहतीत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानादेखील नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात आल्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई कारण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार तहसील, ग्रामपंचायत आणि पोलिसांकडून धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यानुसार गेल्या चार दिवसांत 30 जणांवर कारवाई करण्यात आली.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभर हाहा:कार माजवला आहे. त्याचबरोबर पनवेल महापालिका हद्दीतदेखील कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे, तसेच शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातदेखील कोरोना रुग्ण वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार विजय तळेकर यांनी ग्रामीण भागात भरारी पथक तयार केले आहेत. या पथकामार्फत मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणे आदी कारवाया करण्याचा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे.

यानुसार करंजाडे वसाहतीमध्ये नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल कोरडे, उपनिरीक्षक लाला लोणकर, नाईक नंदकुमार माने, थोरात, तलाठी सुवर्णा पवार, ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या पथकाने गेल्या चार दिवसांपासून शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या चार दिवसांत सुमारे 30 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply