मुंबई : प्रतिनिधी
यंदा भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणार्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (दि. 27) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मुंबईत जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.
यजमान असल्याने भारताला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट विश्वचषक सुपर लीगद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सध्या झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतून आणखी दोन संघ स्पर्धेत प्रवेश करतील.
2019च्या अंतिम फेरीच्या पुनरावृत्तीसह 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाला सुरुवात होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. यजमान संघ भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पाच वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, तर भारत आणि पाकिस्तानमधील पहिला सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
प्रत्येक संघ राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये इतर नऊ संघांशी खेळेल. ज्यात अव्वल चार संघ बाद फेरी आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येईल, तर अंतिम सामना रविवारी 19 नोव्हेंबरमध्ये अहमदाबाद येथे होईल.
Check Also
‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले
बिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपट पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह …