Breaking News

हुतात्म्यांचे कार्य भावी पिढीपर्यंत नेणे आवश्यक – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
हुतात्म्यांच्या जाज्वल्य इतिहासाची पार्श्वभूमी आपल्याला लाभली आहे. त्यामुळे त्यांची गाथा पुढील पिढीपर्यंत सासत्याने नेत राहिली पाहिजे, तरच नव्या पिढीला त्याची अनुभूती येऊन येणार्‍या भविष्यात कशा प्रकारे पावले उचलली जावी याचे दिशादर्शन घडत राहिल, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर केेले. ते ‘गीतांजली’ कार्यक्रमात बोलत होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि संस्कार भारती उत्तर रायगड जिल्हा पनवेल समितीच्या वतीने ‘गीतांजली’ या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. 19) करण्यात आले होते. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात इतिहास संशोधक, अभ्यासक व लेखक चंद्रकांत शहासने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या वंशजांना मानपत्र देऊन हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेविका चारूशीला घरत, रूचिता लोंढे, संस्कार भारतीच्या कोकण प्रांत उपाध्यक्ष सुनिता खरे, महामंत्री विजय काळे, कोषाध्यक्ष रवींद्र फडणीस, संगीत विधा संयोजक रसिका फडके, उत्तर रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग गरवारे, उपाध्यक्ष भारती म्हसे, दीपक पळसुले, पनवेल समिती अध्यक्ष वैशाली कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय ऐकतेच्या भावनेतून जे लढले, झगडले आणि प्रसंगी आपले प्राण अर्पण केले अशा हुतात्म्यांचा वंशजांचा या कार्यक्रमात मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवराम राजगुरू यांच्या ज्येष्ठ बंधूंचा नातू सत्यशील राजगुरू, रामा बामा कोळी यांच्या धाकट्या भावाचा मुलगा महादेव कमळ कोळी, मामलेदार जोशी यांचे नातू विलास जोशी यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी इतिहास संशोधक, अभ्यासक व लेखक चंद्रकांत शहासने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले व हुतात्मा भाई कोतवाल यांच्या आठवणींना उजाळा दिला.
गीतांजली या सुरेल गीतांच्या कार्यक्रमात नाट्यपद, स्फूर्तिगीत, समूहगीत, पोवाडा, फटका, पाळणे, उखाणे, काव्य सादर झाले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply