Breaking News

कोरोना काळात आरोग्याबाबत अधिक जागरूक असणे आवश्यक; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन, खारघर येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टिकोनातून अधिक जागरूक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 17) खारघर येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी केले. श्री कच्छ वागड लेवा पाटीदार मित्र मंडळाच्या वतीने टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने खारघर सेक्टर 20 येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 150हून अधिक जणांनी रक्तदान केले. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत श्री कच्छ वागड लेवा पाटीदार मित्र मंडळाचे कौतुक केले, तसेच भाजपचे खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांचे चिरंजीव श्लोक शिंदे याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. या वेळी भाजपचे खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी बेरा, खारघर सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष बीना गोगरी, व्यापारी सेल संयोजक अंबालाल पटेल, वैद्यकीय विद्यार्थी आघाडीचे संयोजक विजय उजळंबे, आदर्श सोहनी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. समाजाचे प्रमुख प्रवीण वाविया, उपप्रमुख अंबालाल पटेल, उपप्रमुख वालजी पटेल, निलेश भाटेसरा, राघू पटेल, नरसिंह पटेल, दिलीप वेळजी, वीरजी पटेल यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. नगरसेवक रामजी बेरा यांचे विशेष योगदान लाभले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply