Breaking News

वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सोनाली पाटील बिनविरोध

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड बुधवारी (दि. 3) करण्यात आली. सोनाली पाटील या वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा जासई विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे युवा नेते विलास पाटील यांच्या पत्नी आहेत. वेश्वी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सोनाली पाटील या भरघोस मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. सरपंच संदीप गणपत कातकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सदस्यांनी सर्वानुमते उपसरपंचपदी सोनाली विलास पाटील यांची बिनविरोध निवड केली. या वेळी सरपंच संदीप कातकरी, सदस्य अजित पाटील, नूतन मुंबईकर, प्रमिला मुंबईकर, निकिता मोहिते, सुनील तांबोळी, संदीप पाटील, ज्योत्स्ना पाटील, ग्रामसेविका रेश्मा ठाकूर, माजी सरपंच विलास पाटील,  विजय पाटील, भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा राणी म्हात्रे, तालुका सरचिटणीस निर्मला घरत, उपाध्यक्षा अरुणा घरत, जासई विभाग अध्यक्ष विश्रांती घरत, तालुका सदस्या निशा म्हात्रे, बूथ अध्यक्ष रुपेश सदाशिव मुंबईकर, जासई विभाग अध्यक्ष मेघनाथ पाटील, शशिकांत मुंबईकर, विद्याधर मुंबईकर, प्रल्हाद पाटील, नरेंद्र म्हात्रे, अशोक पाटील, जगदीश पाटील, विकास पाटील, संजय तांबोळी, गणेश पाटील, नंदकुमार पाटील, उदय पालकर, परम पाटील, अशोक पाटील, प्रीतम मुंबईकर, सुधाकर पाटील, संदेश कोळी, रामनाथ मुंबईकर, सुधाक्रर पाटील, विश्वास कासुकर, अक्षय पाटील तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, एकता सामाजिक संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते. वेश्वी ग्रामपंचायतमध्ये एकूण नऊ सदस्य असून त्यात सात सदस्य भाजपचे तर दोन सदस्य ग्रामविकास आघाडीचे आहेत.

Check Also

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोफत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उलवे नोड 2 आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Leave a Reply