पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पनवेल पंचायत समिती यांच्या सौजन्याने गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये पनवेल तालुका पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी कनिष्ठ वर्धिनी फेरी आयोजनाबाबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी महिलांचे संघटीकरण स्वयंसहाय्याता समुहाच्या माध्यमातून करणे, बचत गट तयार करणे तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी गावातील महिला व आंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक व सामाजिक समावेशन होण्याच्या दृष्टीने सन 2020-21 या आर्थिक वर्षापासून रायगड जिल्हा हा इंटेन्सिव्ह घोषित करणेत आला आहे. या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) पनवेल तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सौजन्याने गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये 2 ते 15 मार्च या कालावधीत पहिली वरीष्ठ वर्धिनी फेरी आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गव्हाण ग्रापंचायतीमध्ये पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या उपस्थितीत वर्धिनी फेरी आयोजनाबाबत महिला, आंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी वरिदा शेख, उषा पाटील, प्रभाग समन्वयक किशोर गोरटे, ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील, पी. एस. चांगोले, सदस्य सरिता कोळी, शुभांगी कोळी, वर्षा देशमुख, ललीता कोळी, मीना देशमुख, सुनीता देशमुख, निता देशमुख, प्रतिक्षा कोळी, हेमा कोळी, वर्धिनी चित्रा एरी, माधुरी निघेकर, जयश्री नामोसे, वनिता कोसरे, प्रनिता घोडाम आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी रत्नप्रभा घरत यांनी महिला बचत गटाबाबत उमेदची भूमिका काय आहे या संदर्भात महिलांना माहिती दिली. त्या म्हणाल्या की, जे बचत गट स्थापन झालेले नाहीत त्यांना स्थापना करून देण्यात येते, तसेच ऑनलाइन नोंदणी करून दिली जाते. जे बचत गट आहेत त्यांना आणखी पुढील योजनांसंदर्भात माहिती दिली जाते.