Breaking News

स्वच्छता अभियान 2021 केंद्राचे पथक अचानक होणार दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

केंद्रीय नागरी मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार्‍या स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण पथक या महिन्यात कोणत्याही क्षणी आगाऊ माहिती न देता नवी मुंबई शहरात दाखल होणार आहे. ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे घोषवाक्य घेऊन देशात पहिला क्रमांक पटकविण्यासाठी तयारीत असलेल्या नवी मुंबईत हे पथक कधीही येऊन पाहणी करणार आहे.

या पाहणीत स्वच्छता, हागणदारी आणि घनकचरा व्यवस्थापन याकडे लक्ष देणार आहे. लोकांचा सहभाग किती आहे हे पाहण्यासाठी अचानक दूरध्वनी सुरू झाले असून आतापर्यंत दीड लाख नागरिकांशी संपर्क साधण्यात आला आहे.

नवी मुंबई पालिकेने स्वच्छ भारत अभियानात यंदा पहिला क्रमांक मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. संपूर्ण शहर विविध चित्र आणि रंगाने रंगविण्यात आले आहे. शहरातील एकही भिंत आकर्षक चित्रांनी रंगवलेली नाही असे झालेले नाही. केवळ रंगीबेरंगी भिंतीबरोबरच पालिका अनेक पातळीवर स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांनी यासाठी पुढाकार घेतला असून लोकांना प्रबोधन केले जात आहे.

नवी मुंबई स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात गेली अनेक वर्षे पहिला क्रमांक पटकविता आहे पण देश पातळीवर मध्य प्रदेशातील इंदूर शहर इतर शहरांना पुढे जाण्याची संधी देत नसल्याचे दिसून येत आहे. जनतेचा सहभाग सर्वोत्तम राहिल्याने हे शहर पहिला क्रमांक गेली पाच वर्षे सोडत नाही. नवी मुंबईत ही स्थिती विरोधाभासाची असून जनतेचा सहभाग कमी पडत आहे. यात नकारात्मक दृष्टिकोन असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. त्यात ग्रामीण व झोपडपट्टी भागातील सहभाग कमी मिळत असून अस्वच्छतेचे काही घटक या भागात दिसून येत आहे.

यापूर्वी पूर्वसूचना करून येणारे केंद्रीय पथक यंदा शहरात अचानक भेटी देणार आहे. मार्चपासून या भेटी सुरू होणार असून कोणत्याही क्षणी हे पथक पाहणी करणार आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply